श्री प्रभुरामचंद्राच्या पदस्पर्शाने कणकण पवित्र झालेली नाशिक ही पुण्यभूमी. जीचा पुराणात अनादी काळापासून उल्लेख आहे. दर १२ वर्षांनी येणारा सिंहस्थ कुंभमेळा ही सर्वात मोठी धार्मिक पर्वणी भक्तांना असते. या नाशिक नगरीत संत परंपरा ही खुप मोठी व पुरातन आहे. नाशिक शहर पंचक्रोशीत पाच संतांची समाधी मंदिरे आहेत. त्यात श्री स्वामी नारायण, श्री अजगरेश्वर महाराज, श्री चंद्रमौलेश्वर महाराज, श्री अद्वैतेश्वर, श्री नरसिंग गोपालदास महाराज.
प. पू. परमहंस श्री नरसिंग गोपालदास महाराज यांची संजीवन समाधी गंगाघाट, गाडगे महाराज पुलाजवळ, म्हसोबा पटांगण येथे आहे. श्री कोठून आलेत त्यांचे नाव, गांव या विषयी फारशी माहिती उपलब्ध नाही. परंतु त्यांचे कार्य व माहिती त्यांना असणाऱ्या परमहंस या नाम विधानानेच लक्षात येते की त्यांचा अधिकार फार मोठा होता. ते काही भक्तांना रामकुंडाजवळ असणाऱ्या भाट्यांचे धर्मशाळेमागील आळवाच्या वाफ्यात चिखलात पहुडलेले प्रथम दिसून आले. त्या वेळेस त्यांचे अंगावर साप, नाग खेळत होते व श्रींना उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून त्यांच्या मुखकमलावर आपला फणा उभारून नागराज सावली करीत होते. असे दृश्य बघितल्यावर भक्त चकित झाले. त्यांनी महाराजांची मनोभावे सेवा केली व त्यांना विनंती करून रामकुंडामध्ये स्नान करून राम मंदिराच्या पूर्व दरवाजा येथे आणले. येथे श्रींनी सव्वावर्ष कायम उभे राहून ॐ नृसिंह ह्या आपल्या आराध्य देवतेचा जप केला म्हणून लोक त्यांना नरसिंग महाराज म्हणू लागले.
पुढे वाचा...श्री परमहंस नरसिंग
अधिक माहितीसाठी संपर्क :
+91 9373917175, +91 9372312119, +91 8070721010, +91 9371809055
सकाळी | ०६:०० वाजता | आरती |
---|---|---|
दुपारी | १२:०० वाजता | महानैवेद्य |
संध्याकाळी | ०७:३० वाजता | आरती |
गुरुवार - संध्याकाळी | ०७:३० वाजता | महाआरती |