सकाळी | ०६:०० वाजता | आरती |
---|---|---|
दुपारी | १२:०० वाजता | महानैवेद्य |
संध्याकाळी | ०७:३० वाजता | आरती |
गुरुवार - संध्याकाळी | ०७:३० वाजता | महाआरती |
ब्रम्हानंदम् परम् सुखदम् केवलं ज्ञानमुर्ती ।
द्वंद्वातीतम् गगन सदृशं तत्वमस्यादितलक्षणम् ॥
एकम् नित्यम् विमल मचलम् सर्वाधि साक्षीभूतम् ।
भावातीतम् त्रिगुण रहितम् सद्गुरू तं नमामि ॥
सुखकर्ता दुःखहर्ता वार्ता विघ्नाची । नुरवी पुरवी प्रेम कृपा जयांची ।।
सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची । कंठी शोभे माळ मुक्ता फळांची ।।१।।
जयदेव जयदेव जय मंगलमुर्ती । दर्शन मात्रे मन कामनापुर्ती ।।धृ।।
रत्नखचित फरा तुज गौरी कुमरा । चंदनाची उटी कुंकुंम केशरा ।।
हिरे जड़ित मुकुट शोभे तो बरा । रुण झुणती नुपुरे चरणी घागरिया ॥२॥ जयदेव ।।धृ।।
लंबोदर पितांबर फणीवर बंधन । सरळ सोंड वक्रतुंड त्रिनयना ।।
दास रामाचा वाट पाहे सदना । संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुखवर वंदना ।।३।। जयदेव ।।धृ।।
जय देव जय देव जय जय गोपाला ।
स्वामी गोपाला सदगुरूनाथ दिगंबर मुर्ति जगपाला ।।धृ।।
पापविनाशक नाशिक सान्निध गोदातिरी । श्रीचे दर्शन घेता सकल विघ्ने हरती ।
सान्निध्य रम्य तपोवन पंचवटी वदती । वेदे वर्णन करिती कुंठित होय मती ।।१।।
जयदेव, जयदेव ।।धृ।।
पुर्ण ब्रम्ह सनातन राम वसे जेथे । तत्सान्निध राहुनिया करसि महातप ते ।
दर्शन घेता प्राणी पावति मुक्ती ते । वाटे नृसिंह रूपचि अवतरले तेथे ।।२।।
जयदेव, जयदेव ।।धृ।।
नेणोमुढ आम्ही जन अघटित तव महिमा । दासा सत्कृपा होऊनि पुर्ण करी कामा ।
ज्ञानामृत पाजुनिया वाढवि मनि प्रेमा । दत्त ओवाळीतो आरती पदप्रभा ।।३।।
जयदेव, जयदेव ।।धृ।।
ओवाळू आरती माझ्या सद्गुरूनाथा ।। बाबा जंगली
देवा पंचही तत्वाचा दिप लाविला आता ।।धृ।।
निर्गुणाची स्थिती कैसी आकारा आली, बाबा आकारा आली ।
सर्वाघटी भरुनी उरली माझी जंगली माऊली ।।१।।
रज तम सत्व रिघे माया उद्भवली ।
मायेच्या पोटी कैसी माया प्रसावली ॥२॥
सद्भाव सागरी कैसा खेळ मांडीला, बाबा खेळ मांडिला ।
खेळ खेळुनिया अवघा विस्तार केला ।।३।।
आम्हा वाटते रात्रदिन रूप पहावे । बाबा गुणगात रहावे ।
वाणी दासाची वाट देवाची ऐसे नाम व्हावे ।।४।।
ब्रम्हांडाची रचना बाबा दाखवा डोळा । बाबा दाखवा डोळा ।
दास म्हणे स्वामी माझा कृपाळू भोळा ।।५।।
ब्रम्हा, विष्णु, महेश तुझे ध्यान करिती सदा । बाबा रूप पाहती सदा ।
ब्रम्हादिकांचा आधार तु प्रभु जंगली देव माझा ।।६।।
कापुराची आरती करितो प्रेमे सदगुरूला, भावे सदगुरूला
सच्चिदानंदे रूप पाहुनी आनंद झाला ।।१।।
देह कर्दळी उकळवुनी शुध्द कापुर काढीला ।
भक्ती वडी ही घेऊनी हाती लावू ज्योतीला ॥२॥।
ज्ञान ज्योती लावुनिया ओवाळू हरिला ।
चिन्मय रूप पाहुनी तनमय होती हरूला ।।३।।
कापुराची आरती करितो प्रेमे सदगुरूला, भावे सदगुरूला
सच्चिदानंदे रूप पाहुनी आनंद झाला ।।४।।
सदा सर्वदा योग तुझा घडावा । तुझे कारणी देह माझा पडावा ।
उपेक्षु नको गुणवंता अनंता । रघुनायका मागणे हेच आता ।।
ज्या ज्या ठिकाणी मन जाये माझे । त्या त्या ठिकाणी निजरुप तुझे ।
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी । तेथे तुझे सदगुरू पाय दोन्ही ।।
सदगुरू समर्था मी बाळ तान्हे । तुझीच सेवा करू काय जाणे ।
अन्याय माझे कोट्यान् कोटी । सदगुरू समर्था घालावे पोटी ।।
अनंत कोटी ब्रम्हांडनायक महाराजाधीराज योगीराज
परब्रह्म सच्चिदानंद भक्त प्रतिपालक
गोदातीर निवासी श्री सदगुरू नरसिंग महाराज की....... जय
श्री सदगुरू गजानन महाराज की....... जय
श्री सदगुरू साईनाथ महाराज की....... जय
श्री सदगुरू श्रीनाथ महाराज की....... जय
श्री सदगुरू दादा महाराज की....... जय
श्री सदगुरू जंगली महाराज की....... जय
श्री सदगुरू जंगलीदास महाराज की....... जय
श्री सदगुरू शिवानंद सरस्वती महाराज की....... जय
सब संतन की....... जय
ॐ गुरुदेव
गुर्रु ब्रम्हा गुर्रु विष्णुः गुर्रु देवो महेश्वरा ।
गुरुः साक्ष्यात् परब्रम्ह तस्मैस् श्री गुरवेनमः ॥
शान्ताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं
विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्ण शुभांगम ।
लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगिभिर्ध्यानगम्यं
वन्दे विष्णुं भवभयहरं सर्वलोकैकनाथम् ।।
श्री सदगुरूनाथ महाराज की जय ॥
ॐ गुरुदेव ।।
जप (२१ वेळा) ॐ नमो भगवते नरसिंग गोपालदासाय नमः ॥
हे सदगुरू गोपालदासा सर्वांना आरोग्य, ऐश्वर्य, सुख, शांती, समाधान द्या, सर्वांचे कल्याण करा, हीच तुमच्या चरणी प्रार्थना ।।
श्री सदगुरू नरसिंग महाराज की जय ।।