नाशिक हे भारताच्या प्रमुख रेल्वे मार्गांवर आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानक हे मध्य रेल्वेच्या मार्गावर आहे. दिल्ली, मुंबई, पुणे, इंदूर, आणि नागपूर सारख्या महत्त्वाच्या शहरांशी नाशिक रोड रेल्वे स्थानक जोडलेले आहे.
नाशिक हे उत्तम रस्ते नेटवर्कद्वारे महाराष्ट्राच्या विविध भागांशी जोडलेले आहे.
नाशिकचे औद्योगिक क्षेत्र "ओझर" येथे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) विमानतळ आहे.
नाशिक हे भारतातील महत्त्वाचे धार्मिक आणि पर्यटन स्थळ आहे. येथे पुराणकालीन मंदिरांसह निसर्गरम्य ठिकाणे देखील आहेत. खालीलप्रमाणे नाशिकच्या आसपासची प्रमुख तीर्थस्थाने व पर्यटन स्थळांची माहिती दिली आहे.